एक काळ असा होता की, हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मराठी कलाकारांकडे तुच्छतेने बघितले जायचे. पण आता तसा खूप बदल झाला आहे. कोणत्याही हिंदी चित्रपटात एक तरी मराठी कलाकार असतो. संगीत क्षेत्रात तर मराठीच कलाकार मोठ्या संख्येने असतात. त्यातील एक नवं नाव आहे दिनेश अर्जुना.
त्यांचं खरं नाव दिनेश अर्जुन निंबाळकर असं असून ते मूळचे विदर्भातील अकोल्याचे. मराठी हिंदी-उर्दू गझल गायक ही त्यांची ओळख. सुमारे 15 वर्षांपूर्वी नशीब आजमावण्यासाठी ते अकोल्याहून मुंबईत आले आणि सुरू झाला धडपडता प्रवास. नुकताच त्यांनी संगीत दिलेला ‘श्रद्धा’ हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला आहे. हिंदी चित्रपटांना मराठी संगीतकारांनी संगीत देण्याची परंपरा तशी जुनीच. पण सध्याच्या झगमगत्या दुनियेत मराठीपण हिंदी इंडस्ट्रीत टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अर्जुन यांनी ती केली म्हणूनच ते यशस्वी संगीतकार म्हणून पुढे आले आहेत. देवदासींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून उदित नारायण, श्रेया घोषाल, अनुराधा पौडवाल, कैलास खेर, कविता कृष्णमूर्ती आदी नामवंतांनी त्यांची गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे अर्जुना यांनी स्वत:ही त्यात एक गाणे म्हटले आहे. ही सर्वच गाणी अतिशय तरल व मधुर आहेत. कैलास खेर व उदित नारायण यांनी त्यांच्या चालीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. संगीताची फारशी सशक्त पार्श्वभूमी नसतानाही एका मराठमोळ्या कलाकाराचं हे यश निश्चित कौतुकास्पद आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘श्रद्धा’ या पहिल्याच चित्रपटाची ‘जयपूर फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित ‘अर्धांगिनी’ व ‘माय हजबण्डस् वाईफ’ या दोन हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मराठीचा झेंडा रोवण्यासाठी धडपडणार्या अर्जुना यांचा प्रवास तेवढा सोपा नाही. पण प्रामाणिकपणा, जिद्द व मेहनत या जोरावर ते यशस्वी झाले. अकोल्यातील सर्वसामान्य कुटुंबातच ते वाढले. आई सुलोचना फार शिकली नव्हती तरी उत्तम गात असे. विशेष म्हणजे वडील नाटकात काम करायचे व हार्मोनियम छान वाजवायचे. त्यामुळे सुरांचे संस्कार आई-वडिलांनीच केले. ए. एम. चौधरी हायस्कूलमध्ये असताना पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावण्याचा छंद जडला. त्यामुळे कवितेची व नंतर गझलची जाण तयार झाली. अकोल्याचे पं. एकनाथपंत कुलकर्णी (पटीयाला घराणे) यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं. नंतर नागपूरच्या पं. प्रभाकर पंत धाकडे यांच्याकडेही गाण्याचे धडे गिरवले. कॉलेजमध्ये असताना मराठीतील प्रसिद्ध गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत हे अर्जुना यांना शिकवायचे. त्यांच्यामुळेच मराठी गझलशी नातं अधिक समृद्ध झालं. विदर्भासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी गझल गायनाचे कार्यक्रम केले. खरं तर कंपोझिशन करणे व ती गाणं या भिन्न गोष्टी आहेत. पण अर्जुना यांच्या श्वासात व रक्तात संगीत असल्याने दोन्ही किमया त्यांना साधली आहे. विशेषत: उर्दू शब्दांचे उच्चार, त्याचा लहेजा सांभाळणे व अत्यंत सशक्तपणे सुरांच्या माध्यमातून पेश करणं हे सोपं नाही. अर्जुना यांना मात्र शब्द व सूरदेवता प्रसन्न आहेत. त्यांच्या गोड गळ्यातून गझलची एखादी ओळ उमलते तेव्हा श्रोत्यांचं मनही झंकारून जातं.
(दै.सामना_दि.२६ फेब्रुवारी२०११ वरून साभार)

No comments:
Post a Comment