Saturday, October 5, 2013

२७ वर्षांचा सुरेल गझल प्रवास_ माधव डोळे


एखाद्या तरल गझलचे सूर कानावर पडले की नकळत मन हरवून जाते. गझलचे शब्द व चाल याचा अनोखा संगम गझलमध्ये होतो तेव्हा तर आकाश ठेंगणे होते. गेली अनेक वर्षे विदर्भाच्या अकोल्यातील एक मराठी गायक गझल गायनाच्या क्षेत्रात निष्ठेने काम करतोय. त्याचे नाव आहे दिनेश अर्जुना. हिंदी—उर्दू गझल गायनाच्या अनेक मैफली त्यांनी केल्या आहेत. त्यांचे मूळ नाव आहे अर्जुन निंबाळकर.’ तसा न चंद्र राहीला’ हा त्यांचा मराठी गझलांचा पहिलाच अल्बम नुकताच प्रसिद्ध झाला. मराठीतील ज्येष्ठ गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत यांच्या सात गझला यात आहेत. गेली पंचवीसहून अधीक वर्षे गझल गाणार्‍या अर्जुना यांचा पहिला अल्बम असला तरी त्यातील सर्व चाली रसिकांच्या मनाला भिडणार्‍या आहेत.
सध्या रेकॉर्डिंगचे तंत्र अत्याधुनिक झाले आहे. रोज अनेक अल्बम्स मार्केटमध्ये येतात पण त्यातील गाण्यांचे आयुष्य किती असते हे सर्वांनाच ठाऊक आहे.अर्जुना यांच्या अल्बममधील गझला या त्यास अपवाद ठरतील. या अल्बममधील एका गझलेला अर्जुना यांनी तब्बल २७ वर्षांपूर्वी चाल लावली. या गझलचा मतला आहे...
तसा न चंद्र राहिला तशी न रात राहिली
अजूनही तशीच तू तनामनात राहिली
या गझलचा किस्सा गमतीदार आहे. अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयात प्रा.श्रीकृष्ण राऊत शिकवित होते. दिनेश अर्जुना हे त्याच कॉलेजचे विद्यार्था. लहानपणापासून गायनाची आवड. शाळेत असतानाच पाठयपुस्तकांतील कवितांना चाली लावून त्या गाण्याचा छंद जडला होता. वडील उत्कृष्ट हार्मोनियम वाजवायचे. त्यामुळे संगीताचे संस्कार घरातूनच मिळाले. कॉलेजमध्ये ते ’गायक दिनेश’ म्हणून लोकप्रिय होते. अकोल्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होती. या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. राऊत सरांच्या घरी जाऊन त्यांनी मराठी गझल मागितली. ती गझल घेऊन ते घरी आले. त्याचे शब्दच एवढे दिलखेचक होते की अतिशय सुरेख चाल लावली. एवढेच नव्हे तर दुसर्‍याच दिवशी सरांच्या घरी जाऊन त्यांना ही चाल ऐकवली. ती ऐकताच राऊत सरांना धक्काच बसला. कारण रदीफ, मतला, अलामत, जमीन या गझलच्या व्याकरणाबाबत फारशी माहिती नसतानाही त्यांनी लावलेली चाल ही शब्दांच्या पलिकडची होती. सरांच्या तोंडून फक्त उद्गार आले.. व्वा क्या बात है... अर्जुना यांनी ही गझल स्पर्धेत गायली तेव्हा सारे सभागृह स्तंभीत झाले. या स्पर्धेत अर्जुना यांना पहिला क्रमांक मिळाला. या कौतुकाच्या थापेनंतर सुरू झाला गझल गायनाचा अनोखा प्रवास.
पहिल्या गझलला लावलेल्या चालीचा किस्सा सांगताना अर्जुना यांच्या डोळयात दिसत होता तो सत्तावीस वर्षांचा धडपडता पण सुरेल प्रवास. ज्या गझलला २७ वर्षांपूर्वी चाल लावली तीच गझल त्यांच्या पहिल्या वहिल्या अल्बममध्ये रसिकांना ऐकायला मिळते. या अल्बममधील आणखी एका गझलचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्या गझलचा मतला असा आहे
तुझ्या हासण्याचे दिवाणे किती
तुझे चाहते कोण जाणे किती
या अल्बममधील ही गझल म्हणजे वेगळी अनुभूती.राऊत सरांची ही गझल सर्वांच्या आवडीची तर आहेच. पण अर्जुना यांनी स्वतः संगीतबद्ध करून ती ज्या नजाकतीने गायली आहे त्यास तोड नाही. अर्जुना यांची गझल गायकी ऐकल्यानंतर त्यांच्यातील माणूसपणही तेवढयाच प्रकर्षाने जाणवते. जगण्यातील दुःख, वेदना, अन्याय,गरिबी , प्रेम, विरह या सर्व भावना गझलच्या प्रत्येक शेरातून व्यक्त होतात. पण नेमक्या स्वरांची साथ लाभली तरच अशा दर्जेदार रचना तयार होतात. त्या ऐकताना प्रत्येक स्वर व शब्द काळजाला जखम करतो. अशी भावावस्था होते तेव्हाच खर्‍या अर्थाने गझल जगता येते. ती अवस्था निर्माण करण्याचे शिवधनुष्य अजर्र्ुना यांनी लिलया उचलले आहे. हा गझल अल्बम त्यांच्या चाहत्यांनी स्वतः पैसे जमा करून काढला.त्यावरूनच त्यांचे स्वरसामर्थ्य दिसून येते. गझल गायक म्हणून कार्यरत असताना त्यांनी ’अर्धांगीनी’, ’दि रियल लाईफ ऑफ मंडी’, माय हजबन्डस् वाईफ’ या चित्रपटांनाही संगीत दिले आहे.’शुक्रीया’ हा उर्द्ू गझलांचा त्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे.त्यांच्या पहिल्या वहिल्या मराठी गझल अल्बमला सुरेल आदाब...

दै.सामना_५ ऑक्टोबर १ ३_फुलोरा पुरवणी


Monday, January 21, 2013

तसा न चंद्र राहिला : मराठी गझलांचा माझा नवीन अल्बम


                                                 
                                                     गझल : श्रीकृष्ण राऊत

Wednesday, March 9, 2011

दिनेश अर्जुना वैदर्भीय संगीतकार_ प्रेमदास मेश्राम

विदर्भातल्या अकोल्याचे आणि नागपुरात संगीताची शिक्षा घेतलेल्या कलावंताने ‘श्रद्धा इन द नेम ऑफ गॉड’ या हिंदी चित्रपटाला पार्श्वसंगीत देऊन चित्रपट जगतात एक यशस्वी म्युझिक डायरेक्टर म्हणून आपले नाव कमावणारा उभरता संगीतकार आहे दिनेश अर्जुना. दिनेश अर्जुनाचं मूळ नाव आहे दिनेश अर्जुना निंबाळकर. नागपुरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ पं. प्रभाकर धाकडे यांचा तो पट्टशिष्य आहे.
दिनेश अर्जुना यांनी तालसुरांवर आधारलेले सुमधुर आणि टिकाऊ असे संगीत ‘श्रद्धा’ चित्रपटला दिले आहे. दौर सैफी आणि डॉ. दीपक स्नेह यांच्या अर्थपूर्ण आठ गीत रचनांना त्यांनी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण, श्रेया घोषाल, अनुराधा पौडवाल, कैलाश खेर, कविता कृष्णमूर्ती, हिमानी मधुश्री आणि स्वत: दिनेश यांनी ध्वनिमुद्रित केल्या. ही सर्वच गाणी अतिशय तरल व मधुर आहेत. गाणी ऐकणाऱ्यांच्या मनात ही गाणी वारंवार ऐकाविशी वाटतील अशीच झालेली आहेत. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आज सुमधुर संगीताचा रचनाकार म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्विवादपणे सिद्ध करून दाखवली आहे.
२८ जानेवारीला मुंबईत ‘श्रद्धा’ सिनेमा प्रकाशित झाला. या सिनेमात सोनाली कुलकर्णी, सीमा विश्वास, रवी किसन, जैकी श्राफ, शक्तीकपूर, बेनजामिन गिलानी आणि दीप्ती नवला यांच्या मुख्य भूमिका आहेत. सर्वाचाच अभिनय चांगला झालेला आहे.
हा चित्रपट देवदासी जीवनावर आधारित आहे. प्रत्येक माणूस आपल्या गरजेचा गुलाम आहे. त्याची आवश्यकता आणि लालच त्याला आंधळा बनवते. त्याला कुठे घेऊन जाते आणि काय काय करवून घेते याचे एक उदाहरण म्हणजे हा चित्रपट. देवदासी म्हणायला तर ती देवाची दासी आहे. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. देवांच्या नावावर तिच्या टोपलीत अन्नाचे जेवढे दाणे पडतात तेवढे तिचे पती होतात आणि हा प्रकार त्या स्त्रीच्या जीवनासोबत मरेपर्यंत चालत असतो, असे गुरूभाई ठाकूर यांचे हृदयस्पर्शी कथासार आहे. दिग्दर्शक हमीद अली यांनी चित्रपटाला चित्तवेधक आणि मनोरंजनपूर्ण केले आहे. यातील स्त्री कलाकाराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


                                                                                         कविता कृष्णमूर्ती

दिनेश अर्जुना यांना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच गायनाचा छंद होता. संगीताची आवड त्यांच्या गायिका असलेल्या आईकडूनच मिळाली. त्यांचे वडील हार्मोनियम वादक होते. दिनेश यांनी अकोल्याचे पं. एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. पुढे नागपुरात येऊन पं. प्रभाकर धाकडे, संगीततज्ज्ञ यांच्याकडे गायनाचे विशेष शिक्षण घेऊन पुढे त्यांनी मुंबई गाठली. त्यांनी सर्वात प्रथम ‘जय श्रीचक्रधरा’ या अल्बमकरिता १९९० मध्ये गायन केले. त्यानंतरही अनेक अल्बमकरिता ते गायले आहेत. गझलसुद्धा ते उत्कृष्टपणे गातात. त्यांच्या गझल अल्बम ‘शबनशी’ हा टी-सिरीजने मागच्या वर्षीचा काढलेला आहे. ते मुंबई, पुणे या ठिकाणी आपले स्वतंत्र कार्यक्रम सुद्धा करीत असतात. ते मन मिळावू व पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत.
श्रद्धा सिनेमाची निवड जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकरिता झालेली आहेत. तसेच फ्रांसच्या कान्स फिल्म फेस्टिवलकरिता सुद्धा या सिनेमाची निवड झालेली आहे हे विशेष मिडीयाने सुद्धा या सिनेमाची व संगीताची स्तुती केलेली आहे.
त्यांनी संगीत दिलेले दोन हिंदी सिनेमा प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. पहिला चित्रपट आहे ‘अर्धागिणी एक अर्ध सत्य’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित आहे. रीमा मुखर्जी प्रोडय़ुसर आणि डायरेक्टर आहेत. दिनेश अर्जुनानी या सिनेमातील गाणी सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग, कविता कृष्णमूर्ती, हरिहरन. वसुंधरा दास आणि स्वत:च्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेली आहेत. हा चित्रपट २५ मार्चला प्रकाशित होण्याची शक्यता आहे. दुसरा चित्रपट आहे. ‘माय हसबन्ड्स वाईफ’ हा सिनेमा परदेशातल्या आणि पंजाबच्या कौटुंबिक संस्कृतीवर आधारित आहे.
दिनेश अर्जुना त्यांनी भविष्यात सुद्धा नवीन सुमधुर, सुंदर आणि दीर्घ काळ चालणाऱ्या संगीताची निर्मिती करून विदर्भातील अकोला व नागपूर शहरांची प्रसिद्धी आणि आदर वाढवावा हिच अपेक्षा.
______________________________________________
 प्रेमदास मेश्राम
९६२३२१५८५२
(दै.लोकसत्ता_दि.९ मार्च २०११ वरून साभार)

मराठी सुरांचा हिंदी अविष्कार_ माधव डोळे

एक काळ असा होता की, हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मराठी कलाकारांकडे तुच्छतेने बघितले जायचे. पण आता तसा खूप बदल झाला आहे. कोणत्याही हिंदी चित्रपटात एक तरी मराठी कलाकार असतो. संगीत क्षेत्रात तर मराठीच कलाकार मोठ्या संख्येने असतात. त्यातील एक नवं नाव आहे दिनेश अर्जुना.

                                                                                     कविता कृष्णमूर्ती

त्यांचं खरं नाव दिनेश अर्जुन निंबाळकर असं असून ते मूळचे विदर्भातील अकोल्याचे. मराठी हिंदी-उर्दू गझल गायक ही त्यांची ओळख. सुमारे 15 वर्षांपूर्वी नशीब आजमावण्यासाठी ते अकोल्याहून मुंबईत आले आणि सुरू झाला धडपडता प्रवास. नुकताच त्यांनी संगीत दिलेला ‘श्रद्धा’ हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला आहे. हिंदी चित्रपटांना मराठी संगीतकारांनी संगीत देण्याची परंपरा तशी जुनीच. पण सध्याच्या झगमगत्या दुनियेत मराठीपण हिंदी इंडस्ट्रीत टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अर्जुन यांनी ती केली म्हणूनच ते यशस्वी संगीतकार म्हणून पुढे आले आहेत. देवदासींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून उदित नारायण, श्रेया घोषाल, अनुराधा पौडवाल, कैलास खेर, कविता कृष्णमूर्ती आदी नामवंतांनी त्यांची गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे अर्जुना यांनी स्वत:ही त्यात एक गाणे म्हटले आहे. ही सर्वच गाणी अतिशय तरल व मधुर आहेत. कैलास खेर व उदित नारायण यांनी त्यांच्या चालीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. संगीताची फारशी सशक्त पार्श्‍वभूमी नसतानाही एका मराठमोळ्या कलाकाराचं हे यश निश्‍चित कौतुकास्पद आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘श्रद्धा’ या पहिल्याच चित्रपटाची ‘जयपूर फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित ‘अर्धांगिनी’ व ‘माय हजबण्डस् वाईफ’ या दोन हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

                                                उदित नारायण

हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मराठीचा झेंडा रोवण्यासाठी धडपडणार्‍या अर्जुना यांचा प्रवास तेवढा सोपा नाही. पण प्रामाणिकपणा, जिद्द व मेहनत या जोरावर ते यशस्वी झाले. अकोल्यातील सर्वसामान्य कुटुंबातच ते वाढले. आई सुलोचना फार शिकली नव्हती तरी उत्तम गात असे. विशेष म्हणजे वडील नाटकात काम करायचे व हार्मोनियम छान वाजवायचे. त्यामुळे सुरांचे संस्कार आई-वडिलांनीच केले. ए. एम. चौधरी हायस्कूलमध्ये असताना पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावण्याचा छंद जडला. त्यामुळे कवितेची व नंतर गझलची जाण तयार झाली. अकोल्याचे पं. एकनाथपंत कुलकर्णी (पटीयाला घराणे) यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं. नंतर नागपूरच्या पं. प्रभाकर पंत धाकडे यांच्याकडेही गाण्याचे धडे गिरवले. कॉलेजमध्ये असताना मराठीतील प्रसिद्ध गझलकार प्रा. श्रीकृष्ण राऊत हे अर्जुना यांना शिकवायचे. त्यांच्यामुळेच मराठी गझलशी नातं अधिक समृद्ध झालं. विदर्भासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी गझल गायनाचे कार्यक्रम केले. खरं तर कंपोझिशन करणे व ती गाणं या भिन्न गोष्टी आहेत. पण अर्जुना यांच्या श्‍वासात व रक्तात संगीत असल्याने दोन्ही किमया त्यांना साधली आहे. विशेषत: उर्दू शब्दांचे उच्चार, त्याचा लहेजा सांभाळणे व अत्यंत सशक्तपणे सुरांच्या माध्यमातून पेश करणं हे सोपं नाही. अर्जुना यांना मात्र शब्द व सूरदेवता प्रसन्न आहेत. त्यांच्या गोड गळ्यातून गझलची एखादी ओळ उमलते तेव्हा श्रोत्यांचं मनही झंकारून जातं.


(दै.सामना_दि.२६ फेब्रुवारी२०११ वरून साभार)

Tuesday, March 8, 2011

*श्रद्धा चित्रपटाच्या ध्वनीमुद्रणाची काही सुरेल चित्रे *

                                                                   कविता कृष्णमूर्ती
                                                                 अनुराधा पौडवाल
                                                             श्रेया घोषाल

                                                उदित नारायण






                                                                                              कैलाश खेर





















Sunday, March 6, 2011

Saw the movie with my family and liked it; we living in cities are still not that aware of the Devdasi tradition. Such films should be made to make everyone aware of the trauma and exploitation that women suffer under the name of tradition in our country.I m sure this film will remind you all the movies of 70s and 80s.Even the music is recall of melodies era. Hope there will be more movies coming up with the same concept of awareness happening in our country.

Review posted by: ERICA BILLION

ERICA BILLION
About me: Administrative Head for Perfect Woman magazineLocation: mumbai, India
Friends: 2Clubs: 1
My recent posts: (view all posts)